मंगळवार, १६ जून, २०२०

महानगरपालिका क्षेत्रात विद्यानगर येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात वार्ड क्र. 8 मधील विद्यानगर गल्ली नं. 6 वारणाली, विश्रामबाग, सांगली हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. सदर क्षेत्रामध्ये दि. 6 जून पासून कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी चालू होती. सदर क्षेत्रातील कोरोना पॉझिटीव्ह आढळलेली व्यक्ती सर्व हाय रिस्क कॉन्टॅक्टस् सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या लॅबमधील रिपोर्टनुसार निगेटीव्ह आलेले आहेत. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी जारी केलेली दि. 6 जून 2020 ची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 12 जून रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. 
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा