मंगळवार, १६ जून, २०२०

कडेगाव तालुक्यातील विहापूर गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : कडेगाव तालुक्यातील मौजे विहापूर गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - कडेगाव तालुक्यातील मौजे विहापूर येथील 1) टेंभू कालव्याच्या पश्चिमेकडील बाजू गाव तलावापर्यंतचा भाग 2) पांडुरंग दाजी चव्हाण गट नं 1406 पासून पश्चिमेस कामथी रोड पर्यंत 3) मेंढ वसाहतीपासून कामथीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेस कालव्यापर्यंत 4) गाव तलावापासून पूर्वेकडे शिवाजी चव्हाण गट नं. 1106 पर्यंत, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा