बुधवार, ३ जून, २०२०

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जदारांना हप्ते व व्याज भरण्यास विलंबावधीची 31 ऑगस्ट पर्यंत मुभा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

कर्जदारांनी कंपनीकडे अर्ज करून हप्ते भरण्याची मुदत वाढवून घ्यावी

सांगली दि. 3( जि.मा.का) :  मायक्रो फायनान्स कंपन्याकडून व्यवसायासाठी अन्य कारणासाठी सूक्ष्म लघु कर्ज घेतले आहे, अशा व्यक्तींना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत थांबल्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यास अडचण होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रिजर्व बँकेने दिनांक 27 मार्च 23 मे 2020 च्या निर्देशानुसार मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वितरीत केलेल्या सूक्ष्म लघु कर्ज धारकांना हप्ता व्याज यामध्ये विलंबावधीची (मोरेटोरीयम) मुभा दि. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवून दिली आहे. मायक्रो फायनान्स कंपनी लघु बँकेकडून कर्ज घेतलेल्या ज्या सूक्ष्म लघु कर्ज धारकांना कर्जाचे हप्ते भरणे शक्य होत नाही, त्यांनी कंपनीकडे अर्ज करून हप्ते भरण्याची मुदत वाढवून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
भारतीय रिजर्व बँकेच्या या निर्देशामुळे गरीब कुटूंबातील व्यक्ती बचत गटातील महिलांना दिलासा मिळाला आहे.  याबाबत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या शिखर संस्थेने सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांना पुढीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत. लघु सूक्ष्म कर्ज धारकांना कर्ज फेडण्यासाठी विलंबावधी दि. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवून घेता येईल. त्यासाठी कर्जदाराने अर्ज कंपनीकडे करावायाचा आहे. विलंबावधी वाढवून घेतला तरी कर्जावरील व्याजदरात वाढ होणार नाही. विलंबावधी वाढवून घेतला तर त्यांच्या कर्जाची मुदत सहा महिन्यांनी पुढे जाईल. त्यामुळे कर्जदारांना संस्थेचे थकबाकीदार समजले जाणार नाही. विलंबावधी वाढवून घेणाऱ्या कर्जदारांना व्याज हप्ते यासंबंधी सर्व माहिती कंपनीने स्थानीक भाषेत समजावून सांगावी, अशा सूचना दिल्या आहेत.
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा