गुरुवार, २५ जून, २०२०

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वारणा प्रकल्पावरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांच्या विशेष दुरुस्तीसाठी 8 कोटी 43 लाख केले मंजूर

मांगले - सावर्डे चावरे (कुंडलवाडी) बंधाऱ्यांची होणार विशेष दुरुस्ती

सांगली जि.मा.का 25 : वारणा प्रकल्पाच्या 87 हजार हेक्टर लाभ क्षेत्रापैकी 46 हजार 78 हेक्टर क्षेत्र वारणा नदीवरील उपसा सिंचन योजनेव्दारे सिंचनाखाली आणण्याचे नियोजित आहे. त्यासाठी वारणा धरण ते वारणा- कृष्णा संगमापर्यंत कोल्हापूर पध्दतीचे नऊ बंधारे घालण्यात आले आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातील मांगले सावर्डे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे (कुंडलवाडी) या दोन कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांचा समावेश आहे. तथापि, सदर दोन्ही बंधारे जवळपास चाळीस वर्षापासून असल्याने त्यांची मोठ्याप्रमाणावर दुरुस्ती होणे आवश्यक आहे. यासाठी जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी 21 जून रोजी याची प्रत्यक्ष पाहणी करुन चावरे कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यास 4 कोटी 47 लाख मांगले सावर्डे कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यास 3 कोटी 96 लाख इतक्या रक्कमेस विशेष दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. 
वारणा नदीस दरवर्षी किमान दोन वेळा महापूर येत असतो, तसेच रब्बी हंगामापासून उन्हाळी हंगाम संपेपर्यंत बंधाऱ्यात वेळोवेळी प्रकल्पिय सिंचन, तसेच म्हैशाळ उपसा सिंचन योजनेसाठी सोडावे लागणारे पाणी यामुळे बंधाऱ्यामध्ये बहुतांशीवेळी पूर्ण संचय पातळी पर्यंत पाणीसाठा करावा लागतो. शिराळा तालुक्यातील मांगले - सावर्डे येथे सन 1979 साली बंधारा बांधलेला असून 1979 पासून पाणीसाठा करण्यात येत आहे. सदर बंधाऱ्याची एकूण लांबी 109.40 मीटर जास्तीत जास्त उंची 11.44 मीटर असून एकूण 24 गाळे आहेत. बंधाऱ्याची जास्तीत जास्त साठवण क्षमता 5.56 दलघमी (196.35 दलघफू) असून प्रकल्पीय सिंचन क्षमता 10015 हेक्टर आहे. सदरचा बंधारा जवळजवळ 38 वर्षापुर्वी बांधालेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे (कुंडलवाडी) येथे एक कोल्हापूर पध्दतीचा बंधारा सन 1973 साली बांधलेला असून 1974 पासून पाणीसाठा करण्यात येत आहे. सदर बंधाऱ्याची एकूण लांबी 90 मीटर जास्तीत जास्त उंची 12.32 मीटर असून एकूण 29 गाळे आहेत. बंधाऱ्याची जास्तीत जास्त साठवण क्षमता 4.75 दलघमी (167.75 दलघफू) असून प्रकल्पीय सिंचन क्षमता 8548 हेक्टर आहे. सदरचा बंधारा जवळजवळ 45 वर्षापुर्वी बांधालेला आहे.
दोन्ही बंधाऱ्यांस 40 वर्षे इतका प्रदिर्घ कालखंड झालेला आहे. सततच्या पाण्याच्या दाबामुळे दगडी बांधकामास असलेले बंधाऱ्याचे पिलर कमकुवत झालेले आहेत. पिलरचे दगडी बांधकाम बऱ्याच ठिकाणी निखळलेले तर काही ठिकाणी तुटुन पडलेले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात बरगे बसविणे अडचणीचे झालेले आहे. यासाठी दोन्ही बंधाऱ्याच्या विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मानसिंगभाऊ नाईक यांच्या सोबत दिनांक 21 जून 2020 रोजी वारणा प्रकल्पाच्या भेटीच्या दरम्यान सदर बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पहाणी केली. त्यानुसार चावरे बंधाऱ्यास रुपये 4 कोटी 47 लाख मांगले-सावर्डे बंधाऱ्यास 3 कोटी 96 लाख इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा