मंगळवार, २ जून, २०२०

शिराळा तालुक्यातील मणदूर गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : शिराळा तालुक्यातील मौजे मणदूर गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - शिराळा तालुक्यातील मौजे मणदूर येथील 1) शामराव ज्ञानू सावंत यांचे घर ते संपत गणपती पाटील यांचे घर 2) संपत गणपती पाटील यांचे घर ते मारूती श्रीपती चौगुले यांचे घर 3) मारूती श्रीपती चौगुले यांचे घर ते शामराव ज्ञानू पाटील यांचे घर 4) शामराव ज्ञानू पाटील यांचे घर ते शामराव ज्ञानू सावंत यांचे घर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) रामचंद्र जर्नादन गुरव यांची जमीन ते ईश्वर रावजी नायकवडी यांची जमीन 2) ईश्वर रावजी नायकवडी यांची जमीन ते तानाजी विठू पाटील यांची जमीन 3) तानाजी विठू पाटील यांची जमीन ते केशव गणपती कांबळे यांची जमीन 4) केशव गणपती कांबळे यांची जमीन ते रामचंद्र जर्नादन गुरव यांची जमीन.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा