मंगळवार, २ जून, २०२०

कडेगाव तालुक्यातील नेर्ली गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : कडेगाव तालुक्यातील मौजे नेर्ली गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - कडेगाव तालुक्यातील मौजे नेर्ली येथील 1) कोतवडे - नेर्ली रस्त्यावरील गाव ओढ्याच्या पुलापासून उत्तर पूर्व बाजू 2) ग्रामपंचायत नेर्ली समोरून कोतवडेकडे जाणाऱ्या रस्त्याची पूर्व बाजू  3) कडेगाव ते नेर्ली रस्त्यालगत जि. प. शाळेजवळ पश्चिमेकडील भाग 4) सोनसळ ते तडसर जाणाऱ्या रस्त्याच्या उत्तर बाजूचा भाग, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) मौजे कोतवाडे येथील गट नं. 220 2) मौजे नेर्ली ते अपशिंगे रस्त्याला छेडून जाणारा टेंभू कालवा 3) मौजे नेर्ली येथील गट नं. 1012 4) मौजे नेर्ली येथील गट नं. 666, 473.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा