बुधवार, ३ जून, २०२०

सद्या धरणातून पूरनियंत्रणासाठी पाणी सोडण्याची शक्यता नाही कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये - कार्यकारी अभियंता नामदेव करे


सांगली दि. 3( जि.मा.का) : सध्या निसर्ग चक्री वादळामुळे पर्जन्यवृष्टी सुरू आहे. धरणातील विसर्ग पिण्याच्या पाण्यासाठी शेतीसाठी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत अचानक वाढ संभवत नाही. आर्यविन पुल, सांगली येथील नदीतील पाण्‌ंी पातळी बंधाऱ्यातील पाणी साठ्यामुळे 5 फूट 9 इंच इतकी आहे. सध्या कोयना, धोम, कन्हेर, उरमोडी, तारळी, वारणा धरणातून पूरनियंत्रणासाठी पाणी सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी केले आहे.
दिनांक 3 जून रोजी धरणामध्ये असलेला पाणीसाठा कंसात विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोयना 32 टक्के (2100), धोम 40 टक्के (584), कन्हेर 26 टक्के (325), उरमोडी 62 टक्के (262), तारळी 39 टक्के (450), वारणा 33 टक्के (निरंक).
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा