गुरुवार, ४ जून, २०२०

तासगाव येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : तासगाव तालुक्यात तासगाव येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - तासगाव तालुक्यात तासगाव येथील 1) दक्षिण - मारूती खानू सावंत घर व विटा रोड - अंतर 0.4 कि.मी. 2) पश्चिम - सचिन सावंता माळी घर व विटा रोड - अंतर 0.5 कि.मी, 3) उत्तर - डॉ. विजय जाधव घर व गोटेवाडी रोड - अंतर 0.5 कि.मी. 4) पूर्व - सुशांत सोपान जाध्व घर व पेटकर प्लॉट - अंतर 0.5 कि.मी., या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) दक्षिण - चिंचणी नाका चौक - अंतर 0.5 कि.मी. 2) पश्चिम - आदित्य पार्क, डबास गल्ली - अंतर 1.2 कि.मी. 3) पश्चिम - बायपास रोड, पाटील मळा - अंतर 1 कि.मी. 4) उत्तर - अर्शद जमादार, शेती बायपास रस्ता - अंतर 1.5 कि.मी. 5) पूर्व - चिंचणी रोड, श्री साई सप्लायर्स - अंतर 1 कि.मी.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा