गुरुवार, ४ जून, २०२०

जिल्ह्यात कृषि विभागाकडून 8359 शेतकऱ्यांच्या बांधावर 1600 क्विंटलहून अधिक बियाणे तर 3700 मे.टनहून अधिक खतांचा पुरवठा - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी

सांगली दि. 4( जि.मा.का) : कोरानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कृषि विभागाने ग्राम पातळीवर शेतकऱ्यांना मागणीनुसार त्यांच्या बांधावर खते व बियाणे पुरवठा करण्याची मोहीम शेतकरी गटामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात खते व बियाणे बांधावर पुरवठ्यासाठी एकूण 708 गट कार्यरत आहेत. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 8 हजार 359 शेतकऱ्यांना 1666.40 क्विंटल बियाणे व 3789.35 मे.टन खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.
तालुकानिहाय शेतकऱ्यांच्या बांधावर खते / बियाणे पुरवठा करण्यात आलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे. मिरज तालुक्यात 878 शेतकऱ्यांना 78 गटांमार्फत 276 क्विंटल बियाणे तर 440 मे.टन खते, वाळवा तालुक्यात 916 शेतकऱ्यांना 82 गटांमार्फत 258 क्विंटल बियाणे तर 392 मे.टन खते, शिराळा तालुक्यात 970 शेतकऱ्यांना 73 गटांमार्फत 283 क्विंटल बियाणे तर 354.35 मे.टन खते, पलूस तालुक्यात 940 शेतकऱ्यांना 81 गटांमार्फत 186 क्विंटल बियाणे तर 312 मे.टन खते, तासगाव तालुक्यात 821 शेतकऱ्यांना 67 गटांमार्फत 121 क्विंटल बियाणे तर 469 मे.टन खते, कडेगाव तालुक्यात 885 शेतकऱ्यांना 83 गटांमार्फत 117 क्विंटल बियाणे तर 458 मे.टन खते, विटा तालुक्यात 853 शेतकऱ्यांना 70 गटांमार्फत 97 क्विंटल बियाणे तर 376 मे.टन खते, आटपाडी तालुक्यात 842 शेतकऱ्यांना 57 गटांमार्फत 96.4 क्विंटल बियाणे तर 338 मे.टन खते, कवठेमहांकाळ तालुक्यात 654 शेतकऱ्यांना 63 गटांमार्फत 104 क्विंटल बियाणे तर 320 मे.टन खते, जत तालुक्यात 600 शेतकऱ्यांना 54 गटांमार्फत 128 क्विंटल बियाणे तर 330 मे.टन खतांचा पुरवठा करण्यात आला आहे.



00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा