सोमवार, ४ मे, २०२०

सांगली जिल्ह्यात कलम 144 लागू सायं. 7 ते सकाळी 7 या कालावधीत अत्यावश्यक नसलेल्या कारणांनासाठी सर्व व्यक्तींच्या संचारास मनाई

सांगली, दि. 04, (जि. मा. का.) :जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाने 17 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्या अनुष्ंगाने सांगली जिल्ह्यात 4 मे ते 17 मे 2020 रोजी 24.00 पर्यत  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये सायंकाळी 7 वाजले नासून सकाळी 7 वाजेपर्यत अत्यावश्यक नसलेल्या कारणांसाठी सर्व व्यक्तींच्या संचारास जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनाई केली आहे.
सदरचा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असणाऱ्या व अन्य अत्यावश्यक सेवा सुविधा व  वस्तू यांच्या पुरवठ्याशी सबंधित व्यक्ती व वाहने आणि कोणत्यही स्वरूपाच्या निकडीच्या प्रसंगास व शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही.
0000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा