शनिवार, ३० मे, २०२०

कडेगाव तालुक्यातील खेराडेवांगी गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : कडेगाव तालुक्यातील मौजे खेराडेवांगी गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत खेराडेवांगी गावात कंटेनमेंट बफर झोन अधिसूचित केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - कडेगाव तालुक्यातील मौजे खेराडेवांगी येथील 1) शिवनी ते खेराडेवांगी रस्त्यापासून पश्चिमेकडील देवनगर पर्यंतचा रस्ता 2) हजारे वस्तीपासून उत्तरेकडील ओढापात्रापर्यंत भाग 3) देवनगर वस्तीपासून पूर्वेकडील ओढापात्रापर्यंतचा भाग 4) उत्तरेस ओढा पात्रापासून दक्षिणेकडील हजारे वस्ती पर्यंतचा भाग.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा