शनिवार, ३० मे, २०२०

वाळवा तालुक्यातील ठाणापूडे गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : वाळवा तालुक्यातील ठाणापूडे गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - वाळवा तालुक्यातील ठाणापूडे येथील 1) शिराळा तालुका हद्द (ठाणापूडे ते देववाडी रस्ता) ते धोंडीराम सिद्राम शिंदे यांचे घर 2) महादेव मंदिर ते राजाराम आनंदा पाटील यांचे घर 3) समाज मंदिर ते सुभाष साधू शिंदे यांचे घर 4) भगवान सिद्राम शिंदे यांचे घर ते गट नं. 387 पर्यंत, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) चिकुर्डे - ठाणापूडे रस्ता मुख्यप्रवेशव्दार ते गट नं. 74 पासून ठाणापुडे रस्ता 2) वारणा नदी ते गट नं. 320 पर्यंत 3) देववाडी - ठाणापूडे रस्ता ते महादेव शिंदे यांचे घर 4) जयसिंग निवृत्ती पाटील यांचे घर ते ठाणापूडे रस्ता (मधला रस्ता).
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा