सांगली,
दि. 29,
(जि. मा.
का.) :
तासगाव तालुक्यातील
मौजे शिरगाव
वि. गावात
कोरोना बाधीत
रूग्ण आढळून
आल्याने जिल्हा
प्रशासनाने अत्यंत
गतीमान हालचाली
करत सदर
रुग्ण ज्या
परिसरातील आहे
तो परिसर
कंटेनमेंट झोन
केला आहे.
तसेच खबरदारीचा
उपाय म्हणून
कंटेनमेंट झोनच्या
परिघाबाहेरील काही
परिसर बफर
झोन केला
आहे. अशी
माहिती जिल्हाधिकारी
डॉ. अभिजीत
चौधरी यांनी
दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - तासगाव
तालुक्यातील मौजे
शिरगाव वि.
येथील
1) पूर्व
- आरफळ
मुख्य कालवा
व विासपूर
सं.नं. 307
ची हद्द
अंतर 0.3
कि.मी. 2)
पश्चिम -
तासगाव विटा
रस्ता राज्य
मार्ग क्र.
60 अंतर
0.075 कि.मी.
3) उत्तर
- सं.नं.
312 एमएससीबी
सब स्टेशन
अंतर 0.3
कि.मी. 4)
दक्षिण -
राजापूर विसापूर
रस्ता व
शिरगाव गट
नं. 13,
14 अंतर
0.3 कि.मी.,
या स्थलसीमामध्ये
अंतर्भूत क्षेत्र
कंटेनमेंट झोन
म्हणून अधिसूचित
केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे -
1) पूर्व
- विसापूर
ओढा अंतर
1.5 कि.मी.
2) पश्चिम
- ठोंबरे
वस्ती मोरे
वस्ती अंतर
2 कि.मी.
3) उत्तर
- पानमळेवाडी
गावची हद्द
अंतर 1
कि.मी. 4)
दक्षिण -
तासगावकडील बाजूचा
गावचा ओढा
अंतर 1.5
कि.मी.
या
भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी
कार्यालयाकडून पारित
करण्यात आलेल्या
सर्व प्रतिबंधात्मक
आदेशांची काटेकोर
अंमलबजावणी करावी,
असे आदेश
जिल्हाधिकारी डॉ.
अभिजीत चौधरी
यांनी दिले
आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा