शनिवार, ३० मे, २०२०

वाळवा तालुक्यातील वाटेगाव गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : वाळवा तालुक्यातील मौजे वाटेगाव गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - वाळवा तालुक्यातील मौजे वाटेगाव येथील 1) मन्सूर काबुल मुल्ला (कारखाना रोड) यांचे घर ते कांचन हणमंत मुळीक (भूई पोळ) यांचे घर 2) कांचन हणमंत मुळीक (भूई पोळ) यांचे घर ते मच्छिंद्र काशिनाथ मुळीक (लोहार गल्ली) यांचे घर 3) मच्छिंद्र काशिनाथ मुळीक (लोहार गल्ली) यांचे घर ते जयवंत यशवंत मुळीक (कारखाना रोड) यांचे घर 4) जयवंत यशवंत मुळीक (कारखाना रोड) यांचे घर ते मन्सूर काबूल मुल्ला (कारखाना रोड) यांचे घर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) शामराव नारायण पाटील यांचे घर ते शंकर दगडू मुळीक (मुळीक वस्ती) यांचे घर 2) शंगर दगडू मुळीक (मुळीक वस्ती) यांचे घर ते पांढरा वाडा 3) पांढरा वाडा ते दत्तात्रय नाना कुंभार यांचे घर 4) दत्तात्रय नाना कुंभार यांचे घर ते शामराव नारायण पाटील यांचे घर.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा