शुक्रवार, २९ मे, २०२०

तासगाव तालुक्यातील कचरेवाडी गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : तासगाव तालुक्यातील मौजे कचरेवाडी गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - तासगाव तालुक्यातील मौजे कचरेवाडी येथील 1) कचरेवाडी - तामखडी रस्ता अंतर 0.3 कि.मी. 2) कचरेवाडी - नरसेवाडी रस्ता अंतर 0.3 कि.मी. 3) कचरेवाडी - घोटी बु. रस्ता अंतर 0.3 कि.मी., या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट         झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) उत्तर बाजू घोटी खुर्द गावाची शीव अंतर 1 कि.मी. 2) उत्तर बाजू तामखडी गावाची शीव अंतर 1 कि. मी. 3) पूर्व किंदरवाडी गावाची शीव अंतर 1 कि.मी. 4) दक्षिण नरसेवाडी गावाची शीव अंतर 1 कि.मी. 5) पश्चिम घोटी बुद्रुक गावाची शीव अंतर 1 कि.मी.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा