शनिवार, ३० मे, २०२०

शिराळा तालुक्यातील चिंचोली गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : शिराळा तालुक्यातील मौजे चिंचोली गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - शिराळा तालुक्यातील मौजे चिंचोली येथील 1) आनंदा बापू मोहिते यांचे घर ते भगवान सखाराम जाधव यांचे घर 2) भगवान सखाराम जाधव यांचे घर ते ग्रामपंचायत कार्यालय इमारत 3) ग्रामपंचायत कार्यालय इमारत ते वारणा कॅनाल पर्यंत 4) वारणा कॅनाल ते आनंदा बापू मोहिते यांचे घर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) शिवाजी नाना जाधव यांचे घर ते फत्तेसिंग विष्णू पाटील यांचे शेड 2) फत्तेसिंग विष्णू पाटील यांचे शेड ते जंगम वस्ती 3) जंगम वस्ती ते ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्याची टाकी 4) ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्याची टाकी ते शिवाजी नाना जाधव यांचे घर.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा