रविवार, १७ मे, २०२०

वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : सांगली जिल्हयातील वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून  आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथील 1) जगन्नाथ दादू वायदंडे यांचे घर ते आनंदा रामचंद्र भोपळे यांचे घर 2) आनंदा रामचंद्र भोपळे यांचे घर ते चॉदसो सिलेमान पटेल यांचे घर 3) चॉदसो सिलेमान पटेल यांचे घर ते आनंदा पांडुरंग पवार यांचे घर 4) आनंदा पांडुरंग पवार यांचे घर ते जगन्नाथ दादू वायदंडे यांचे घर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
या भागांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा