सांगली,
दि. 03,
(जि. मा.
का.) :
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीत एकाची
कोरोना चाचणी पॉझीटीव्ह
आल्याने जिल्हा
प्रशासनाने अत्यंत
गतीमान हालचाली
करत सदर रुग्ण ज्या
परिसरातील आहे तो परिसर
कंटेनमेंट झोन
केला आहे. तसेच खबरदारीचा
उपाय म्हणून
कंटेनमेंट झोनच्या
परिघाबाहेरील काही परिसर बफर
झोन केला
आहे. अशी माहिती
जिल्हाधिकारी डॉ.
अभिजीत चौधरी
यांनी दिली.
कंटेनमेंट झोन
पुढीलप्रमाणे – सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका
हद्दीतील 1) वाघमोडेनगर मेन रोड ते रुमाले नगर डॉ. खोत दवाखाना उत्तर बाजू 2) रुमाले नगर ते स्वामी मळा पाठीमागील बाजून
कुपवाड एमआयडीसी हद्दीवरील स्वामी मळा मोबाईल टॉवर पर्यंत 3) कुपवाड एमआयडीसी हद्दीवरील
स्वामी मळा मोबईल टॉवर ते एमआयडीसी हद्दीतील राजरामबापू कॉलनी पर्यंत 3)
राजरामबापू कॉलनी ते शिवशक्ती नगर उत्तर हद्दीतील जलराम ट्रेडर्स ते मोबाईल टॉवर
दक्षिण उत्तर मिरज रोड पूर्व बाजुकडील रुमाले नगर पर्यंत असा आहे.
बफर झोन
पुढीलप्रमाणे – 1) कुपवाड महावीर व्यायाम शाळा ते कुपवाड
एमआयडीसी मेन रोड ते सावळी रोड चौक पर्यंत 2) सावळी रोड चौक ते मिरज एमआयडीसी रोड
लठ्ठे तंत्रनिकेतन ते मिरज एमआयडीसी जकात
नाका पर्यंत 3) मिरज एमआयडीसी जकात नाका ते शिवशक्तीनगर दक्षिण हद्दीतील कुपवाड
मिरज रोड पोलीस पार्क उत्तर बाजूपर्यंत 4) पोलीस पार्क ते लाड नगर पूर्व बाजू
विजयनगर रस्ता 5) लाड नगर ते सिदधार्थनगर ते महावीर व्यायाम शाळापर्यंत असा आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा