गुरुवार, २ एप्रिल, २०२०

सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत 1006 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये तर 56 व्यक्ती इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली (जि.मा.का) 2 : सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आलेले, सस्पेक्टस कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अशा आतापर्यंत 1480 व्यक्ती आहेत. यापैकी 113 व्यक्ती आयसोलेशन कक्षात दाखल करून या सर्व व्यक्तींची कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 64 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 25 जणांचे स्वॅब टेस्ट पॉझिटीव्ह आले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील आयसोलेशन कक्षात ठेवले आहे. यापैकी एक व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील आहे. 24 व्यक्तींचे स्वॅब तपासणीचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये 56 व्यक्ती (मिरज येथे 29 इस्लामपूर येथे 27) असून होम क्वॉरंटाईन असलेल्या 1311 व्यक्तींपैकी 305 व्यक्तींचा 14 दिवसाचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे.  सद्यस्थितीत 1006 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा