मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

गर्दी जमविणाऱ्या कार्यक्रमांवर 30 एप्रिल पर्यंत बंदी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : करोना विषाणुचा संसर्ग प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे संसर्गबाधित असल्यास त्यात अधिक वाढ होऊ देता त्यावर प्रतिबंधात्मक उपयोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे टाळणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोटकलम (c)   (m), तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अन्वये मोठ्या प्रमाणात लोकांना समुह जमू देण्यासाठी संपुर्ण सांगली जिल्ह्यामध्ये सभा, मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, जत्रा, यात्रा, ऊरुस क्रिडाविषयक इत्यादी कार्यक्रम घेण्यास दिनांक 15 एप्रिल 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 30 एप्रिल 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत बंदी लागू केली आहे.
धार्मिक कार्यक्रमात पुजारी किंवा धर्मगुरु यांना विधिवत पुजा करण्यास तसेच खासगी कार्यक्रम फक्त कौटुंबिक स्वरुपात करण्यास या आदेशाद्वारे बंदी असणार नाही. परंतु या दोन्हीबाबत वैद्यकीय सुरक्षा पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या संदर्भात सर्व शासकीय यंत्रणांनी सभा, मेळावे, सामाजिक, संस्कृतीक, राजकीय, धार्मिक, जत्रा, यात्रा, ऊरुस क्रिडाविषयक इत्यादी कार्यक्रम आयोजनासंदर्भात कोणतीही परवानगी देऊ नये तसेच यापुर्वी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्यात येत आहेत, असे आदेश दिले आहेत.
अशा गर्दीच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यास संबधित संयोजकांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध असे मानन्यात येईल कारवाई करण्यात येईल असे, जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा