सोमवार, १३ एप्रिल, २०२०

निवारागृहातील नागरिकांचा ताण दूर करण्यासाठी महिला व बाल विकास विभागातर्फे विविध उपक्रम


सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : संचारबंदीच्या काळात स्वघरी परतु शकलेल्या श्रमिकांसाठी जिल्हा प्रशासनमार्फत सुरु करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्व निवारागृहात असलेल्या नागरिकांना महिला बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या समुपदेशन केंद्रातील समुपदेशकांद्वारे समुपदेशन करण्यात येत आहे. निवारागृहात प्रशासनाकडून अन्न इतर जीवनोपयोगी वस्तुंचा पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तथापि, निवारा केंद्रात असलेल्या नागरिकांमध्ये घरापासून लांब राहिल्यामुळे मनावर आलेला ताण दूर करण्यासाठी महिला बालविकास विभाग मोलाचे सहकार्य करीत असून त्यासाठी बैठे खेळ, गाण्यांच्या भेंड्या, संगीत खुर्ची, योगासन, प्राणायन, यासारखे विविध उपक्रम समुपदेशकांमार्फत राबविण्यात येत आहेत.
हे सर्व उपक्रम राबवित असताना सोशल डिस्टन्सिंगला कोठेही डावलेले जाणार नाही याची परीपूर्ण काळजीही घेण्यात येत आहे. घरापासून लांब राहून मानसिक खच्चीकरण झालेल्या या श्रमीकांमध्ये थोडीशी आनंदाची उल्हासाची भावना निर्माण करण्याकरिता या संकटाच्या परिस्थितीत धैर्याने सामोरे जाण्याकरीता महिला बालविकास विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यासाठी फरीदा मुल्ला, स्मिता कुंभार, संभाजी शिंदे, मनाली पवार, प्रियंका पवार, विक्रम इंगवले, तृप्ती पाटील, प्रमोद माने यांची यांची समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या आठ समुपदेशकांव्दारे ही प्रक्रिया 30 एप्रिल 2020 अखेर चालू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महिला बालविकास विभाग, सांगली कार्यालयातर्फे देण्यात आली.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा