गुरुवार, २ एप्रिल, २०२०

बँकेतून गर्दी कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार

सांगली (जि.मा.का) 2 : केंद्र सरकारने कोरोना महामारी संदर्भात गरीब महिलांच्या खात्यावर दरमहा रूपये 500/- असे तीन महिन्यासाठी देवू केल्याची घोषणा केली. 3 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या बँकांसाठी हे एक मोठे आव्हान असणार आहे. कारण शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांची पगार, निवृत्ती वेतन धारक हे मोठ्या संख्येने बँकांसमोर रांग लावतील. हे लक्षात घेवून केंद्र राज्य सरकारने आता अभिनव युक्ती अंमलात आणण्याचे ठरविले आहे. वित्त मंत्रालय दिल्लीच्या परिपत्रकानुसार प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत घडलेल्या खात्याच्या शेवटच्या क्रमांकानुसार पैसे त्या त्या दिवशी जमा होतील काढता येतील.
दिनांक 9 एप्रिल नंतर कोणत्याही दिवशी बँकांच्या व्यवहार करण्याच्या वेळात (ज्या आता पूर्वीप्रमाणे करण्यात आल्या आहेत) काढता येतील. सर्व संबंधित महिला ग्राहकांनी आपआपले खात्याचे शेवटचे आकडे पाहून बँकेत पैसे काढण्यास जावे असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी बँकांवरील ताण कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
कृपया महिला खातेदारांनी बँकेशी निगडीत असलेल्या खातेदारांनी शक्यतो ऑनलाईन व्यवहार करावे. खातेदार बँकेत येण्याऐवजी घरी बसून ऑनलाईन सुविधा अवलंबल्यास बँक कर्मचारी पोलीस प्रशासनावर ताण पडणार नाही तुम्हीही कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारापासून आपला बचाव करू शकाल. म्हणून आपण शक्यतो ऑनलाईन व्यवहार करावेत.
Women PMJDY accountholders having account number with last digit as
Date on which amount could be withdrawn by the beneficiaries
0 or 1
3.4.2020
2 or 3
4.4.2020
4 or 5
7.4.2020
6 or 7
8.4.2020
8 or 9
9.4.2020


00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा