मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

ग्रामीण भागातील आजारी व परजिल्ह्यातून आलेल्या लोकांसाठी तपासणी मोहीम - मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत

तपासणी झालेल्यांनी तालुका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

सांगली (जि.मा.का) 7 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. यापैकी कम्युनिटी स्क्रीनींग अर्थात समुदाय तपासणी ही महत्त्वाची मोहीम ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राबवली जात आहे. या मोहिमेत दोन गटातील नागरिकांवर भर देण्यात येत आहे. यामध्ये ताप, खोकला, श्वसनाची अडचण असणारे नागरिक आणि मुंबई, पुणे किंवा परजिल्ह्यातून 1 मार्च नंतर सांगली जिल्ह्यात आलेले नागरिक यांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
    मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत  म्हणाले, या दोन्हीही गटातील लोकांची तपासणी ही आरोग्य यंत्रणेमार्फत सक्रियपणे सुरू आहे. मात्र जर या दोनपैकी कुठल्याही गटातील नागरिकांची तपासणी झाली नसेल तर त्यांनी आपल्या तालुका नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधावा. सदर पद्धतीने संपर्क केल्यास वैद्यकीय अधिकारी घरी येऊन आपली तपासणी करतील. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे. यात सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
    तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे.  जत 02344-248269,  कवठेमहांकाळ  02341-223045, मिरज 0233-2227490, आटपाडी 02343-221717, विटा 02347-276056, कडेगाव 02347-295501, पलूस 02346-226220, तासगाव 02346-242328, शिराळा 02345-271108, इस्लामपूर 02342-224475.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा