सोमवार, २० एप्रिल, २०२०

विजयनगर येथील रूग्णाच्या कुटूंबातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 रूग्ण कोरोनामुक्त
इस्लामपूर येथील कोरोना बाधीत कुटूंबाशी संबंधित महिलेचा दुसरा अहवाल निगेटीव्ह
               

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : विजयनगर, सांगली येथील कोरोना बाधीत झालेल्या काल मृत्यू पावलेल्या रूग्णाशी संबंधित एकूण 16 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये  सदर रूग्णाच्या कुटुंबातील 5 व्यक्ती होत्या. यापैकी आई, वडील, भाऊ पत्नी यांचे अहवाल सकाळीच प्राप्त झाले होते ते निगेटीव्ह होते. रूग्णाच्या मुलाचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला असून तो ही निगेटीव्ह आला आहे. सदर व्यक्तीशी संबंधित संपर्क बाधित अन्य 11 जण इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये होते त्यांचेही अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले असून ते ही निगेटीव्ह आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
तर इस्लामपूर येथील कोरोना बाधीत कुटुंबाशी संबंधित महिला मिरज येथील आयसोलेशन कक्षात उपचार घेत होती. सदर महिलेचा दुसरा अहवालही निगेटीव्ह आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरानाची लागण झालेल्या 27 रूग्णांपैकी 26 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा