रविवार, १९ एप्रिल, २०२०

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्गमित करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधात्मक आदेशांचा कालावधी 3 मे पर्यंत वाढविला


सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत विविध प्रतिबंधात्मक ओदश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशांचा अंमलबजावणी कालावधी दिनांक 30 एप्रिल 2020 पर्यंत निर्गमित करण्यात आलेला होता. तथापि महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 15 एप्रिल 2020 च्या आदेशानुसार सदर कालावधी दि. 3 मे 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्गमित केले आहेत.
भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोटकलम (c) (m), महाराष्ट्र शासन क्र. करोना 2020.प्र.क्र.58/आरोग्य6 दि. 14 मार्च 2020, महाराष्ट्र शासन आदेश क्र. 40-3/2020-डी दि. 24 मार्च 2020, महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1 दि. 13 एप्रिल 2020 अन्वये लागू करण्यात आलेल्या आदेशांमध्ये शासनाच्या आदेशानुसार बदल करणे आवश्यक असून या आदेशांना महाराष्ट्र शासन, महसूल वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, मंत्रालय यांचेकडील आदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/ डीआयएसएम-1 दि. 17 एप्रिल 2020 अन्वये पारित झालेला आदेश अधिक्रमित करतो. त्यानुसार लॉकडाऊन काळात कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्याअर्थी जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या दि. 17 एप्रिल 2020 रोजीच्या आदेशामधील तरतुदींची अंमलबजावणी करण्याबाबत आदेशित केले आहे. या आदेशामध्ये ज्या बाबी नमूद नाहीत त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेले आदेश अंतिम राहतील.
सदरचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक 16 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये पारित केलेल्या अधिसूचनेप्रमाणे इस्लामपूर नगरपरिषद स्थलसीमा हद्दीत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी कंटेनमेंट झोन बफर झोन म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसीमा हद्दीत सदरचा आदेश लागू राहणार नाही. तथापि अशा क्षेत्रापुरते यापूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेले सर्व प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, इंन्सिडंट कमांडर तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाव्दारे प्राधिकृत करण्यात आले आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा