सोमवार, १३ एप्रिल, २०२०

दत्त सेवा भावी मंडळाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाखाची मदत


सांगली, दि. 13, (जि. मा. का.) :  कोवीड-19 च्या संसर्गामुळे जगभरात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे. जगभर हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. जगभर देशभर स्थिती अत्यंत चिंतेची बनली आहे. कोवीड-19 मुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशा या संकटाच्या वेळी समाजाला आधार देण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून श्री दत्त सेवा भावी मंडळ दत्त देवस्थान अंकलखोप औदुंबर यांच्याकडून राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाख रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी दिपक सुर्यवंशी, अमर पाटील, धनंजय सुर्यवंशी, विजय पाटील, गौरव पाटील, इंद्रजीत सुर्यवंशी, संतोष पाटील, अमोल सुर्यवंशी उपस्थित होते.
          यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, महापूर कालावधीमध्ये सुध्दा या मंडळाने मदत कार्य अंकलखोप परिसरामध्ये उभारले होते. वेळोवेळी समाजउपयोगी जनजागृतीचे काम या मंडळाकडून होत असते. संकट काळातही श्री दत्त सेवा भावी मंडळाकरून करण्यात आलेली मदत अत्यंत कौतुकास्पद अभिनंदनीय आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा