गुरुवार, २ एप्रिल, २०२०

दिव्यांगांना सुविधा पुरविण्यासाठी जिल्हास्तरीय कोरोना सहाय्य दिव्यांग कक्ष स्थापन

सांगली (जि.मा.का) 2 : कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदीची घोषणा केली आहे. संचारबंदीच्या कालावधीत दिव्यांग व्यक्तीसाठी उपाययोजना सुचविलेल्या असून दिव्यांगाना सोयी, सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हास्तरावर कोरोना सहाय्य दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामध्ये 8 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दिनांक 31 मार्च पासून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कक्षामध्ये आलेल्या फोन तक्रारी स्वीकारणे सदर तक्रारीच्या अनुषंगाने पुढील योग्य ती कार्यवाही करण्याबाबतचे कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचा दिव्यांग बांधवानी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा नोडल अधिकारी जिल्हास्तरीय कोरोना सहाय्य दिव्यांग कक्ष राधाकिसन देवढे यांनी केले आहे.
संचारबंदीच्या काळामध्ये हालचाल करू शकणाऱ्या दिव्यांगाना सुविधा देण्याबाबत पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे निर्देश विविध यंत्रणांना देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत/नगरपालिका/नगरपंचायत/महानगरपालिका - लॉकडाडुन कालावधी केंद्र शासनाने 21 दिवसांचा केल्याने या कालावधीत दिव्यांग व्यक्तींना (हालचाल करू शकणाऱ्या) जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप करणे. ज्या दिव्यांग व्यक्ती अतितीव्र अपंगत्व असलेल्या किंवा अंथरूणाला खिळून आहेत अशा व्यक्तींना आरोग्य विषयक काळजी घेण्यासाठी सॅनीटायझर, मास्क, रूमाल, फिनेल इत्यादी बाबी स्थानिक प्रशासनाने त्यांच्या निधीतून पुरवाव्यात. जिल्हा पुरवठा अधिकारी / तहसिलदार - साधारणपणे 1 महिना पुरेल ऐवढे साहित्य रेशन दुकानातून देण्यात यावे यासाठी दिव्यांग व्यक्ती किंवा त्याऐवजी दिव्यांग व्यक्तींच्या घरातील कोणीही व्यक्ती आल्यास तात्काळ (विना रांग) रेशन द्यावे. संबंधित पोस्ट ऑफीस (संबंधित बँकींग सेवेकरिता पोस्टमनशी संपर्क साधा) - राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, नागरी / शहरी बँकामधून दिव्यांगाना रांगेत थांबवता तात्काळ सेवा मिळावी. दिव्यांग व्यक्तींना त्यांचे कुटुंबीय यंना या सेवा प्राधान्याने मिळाव्यात. सर्वस्तरीय आरोग्य यंत्रणा - दिव्यांग व्यक्तीस आरोग्य विषयक सेवा आवश्यक असल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग दिव्यांग क्षेत्रात कार्यरत शासकीय / निमशासकीय संस्थांकडून शारिरीक दुर्बलतेमुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या दिव्यांग व्यक्तींची काळजी गांर्भीयाने घेणे गरजेचे आहे. संबंधित अधिक्षक - मनोरूग्ण, बेवारस निरासरीत दिव्यांग व्यक्तींसाठी बालगृहात / सेल्ल्टर होममध्ये विशेष देखभाल करण्यात यावी. जिल्हा समाजकल्याण अधिकारी - दिव्यांगाना टोल फ्री नंबर उपलब्ध करून देणे. तहसिलदार - दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणारी पुढील महिन्याची पेन्शन ॲडव्हान्स देण्यात यावी.
जिल्हास्तरीय दिव्यांग सहाय्यता कक्षामधील अभिजीत खवाटे यांचा संपर्क क्रमांक 9326708265 तर नामदेव घरपणकर यांचा संपर्क क्रमांक 8329548427 असा आहे.


00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा