रविवार, १९ एप्रिल, २०२०

महानगरपालिका हद्दीत कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये विविध प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केलेले आहेत. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये बंदी आदेश पारित केलेले आहेत. सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याच्या पाश्वभूमीवर परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता मानवी जीविताला, आरोग्याला अथवा सुरक्षिततेला धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे महानगरपालिका हद्दीतील ज्या भागात कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आले आहेत, त्या भागामध्ये विषाणूचा संसर्ग प्रसार होवू नये यासाठी सदर भागातील व्यक्ती / जनतेच्या हालचालींवर प्रतिबंधीत क्षेत्रातून बाहेर जाणे बाहेरून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगाने भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीत कंटेनमेंट झोन बफर झोन अधिसूचित केले आहेत.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - (1) विश्रामबाग चौक (हॉटेल हरीश) ते विश्रामबाग रेल्वे फाटक, (2) विश्रामबाग रेल्वे फाटक ते विद्यानगर वारणाली ते जिल्हा परिषद कॉलनी, (3) जिल्हा परिषद कॉलनी ते कुमार हासुरे नगर ते अहिल्यादेवी होळकर चौक (चाणक्य चौक), (4) अहिल्यादेवी होळकर चौक (चाणक्य चौक) ते पालवी हॉटेल (बायपास रोड), (5) पालवी हॉटेल (बायपास रोड) ते भारती हॉस्पीटल सांगली मिरज रोड, (6) भारती हॉस्पीटल ते वानलेसवाडी ते हसनी आश्रम चौक, (7) हसनी आश्रम चौक ते स्फुर्ती चौक ते विश्रामबाग चौक (हॉटेल हरीश). या स्थलसीमा मध्ये अंतर्भूत क्षेत्र (न्यायालय इमारत, प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय हे ना-रहिवाशी क्षेत्र वगळून).
बफर झोन - कंटेनमेंट झोन च्या स्थलसीमा हद्दीबाहेरील 4 कि.मी. त्रिज्येच्या क्षेत्रात समाविष्ट सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील क्षेत्र.
तसेच सदर भागांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली आहे.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा