गुरुवार, २ एप्रिल, २०२०

कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीचा लाभ घेताना आवश्यक खबरदारी घ्या - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

तालुका मुख्यालयाच्या ठिकाणीही शिवभोजन केंद्रे सुरू

सांगली (जि.मा.का) 2 : राज्यातील गरीब गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय दि. 1 जानेवारी 2020 अन्वये सांगली जिल्ह्यात मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 26 जानेवारी पासून सांगली मिरज येथे पाच शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत.  शासन निर्णय दि. 26 मार्च अन्वये सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी, कडेगाव, पलूस जत या तालुक्याच्या मुख्यालय ठिकाणी एस.टी. स्टॅन्ड परिसरात 7 शिवभोजन केंद्रे दिनांक 1 एप्रिल 2020 पासून सुरू करण्यात आलेली आहेत. तसेच वाळवा शिराळा येथे दोन दिवसांत शिवभोजन केंद्र कार्यान्वीत करण्यात येत आहेत. सदरची शिवभोजन केंद्रे दररोज विहीत वेळेत सुरू आहेत. गरीब गरजू जनतेने कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
सांगली जिल्हा मुख्यालयास 900 थाळी इष्टांक मंजूर असून तालुक्यातील शिवभोजन केंद्र यांना एकूण वाढीव 1350 थाळी संख्या मंजूर करण्यात येत असून एकूण 2250 थाळींना मंजूरी मिळाली आहे. प्रत्येक तालुक्याला 150 शिवभोजन थाळी संख्येची मंजूरी देण्यात आली आहे. शिवभोजनालयाची वेळ दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 अशी करण्यात आलेली आहे. तसेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेमुळे शिवभोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो आवेष्टित स्वरूपात भोजन (PACKED FOOD) उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. दिनांक 30 मार्च 2020 पासून पुढील तीन महिन्याकरिता शिवभोजन प्रतिथाळी लाभधारकांकडून 5 रूपये इतकी आकारणी करण्यात येत आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा