सोमवार, २० एप्रिल, २०२०

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : कोरोना विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात येवून शिंकलेने, खोकलेने होते. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेने सदर विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील शहरी ग्रामीण भागात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई केली आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध असे मानण्यात येईल पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशान्वये प्राधिकृत करण्यात आले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा