गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

सद्यस्थितीत ८६ व्यक्ती इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

कडेगाव येथील 30 जण इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) :  सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत 86 व्यक्ती इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. यामध्ये मिरज क्रीडा संकुल येथे 41, शासकीय तंत्रनिकेतन १५ व समाज कल्याण वसतिगृह कडेगाव येथे ३० व्यक्ती आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात ६४० स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या असून ५७१ स्वॅब टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत. आजअखेर 27 जणांना जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेली होती. यापैकी 26 जण कोरानामुक्त झाले असून एकाचा मृत्यू झालेला आहे. तर 42 स्वॅब टेस्टचा अहवाल अप्राप्त आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी दिली.
0000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा