मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

जिल्ह्यात १४३७ व्यक्तींचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण सद्यस्थितीत २९६ व्यक्ती होम क्वारंटाईमनमध्ये - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) :  सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आलेले, सस्पेक्टस कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अशा आतापर्यंत १७३३ व्यक्ती आहेत. यापैकी २९४ व्यक्ती आयसोलेशन कक्षात दाखल करून या सर्व व्यक्तींची कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 389 स्वॅबची तपासणी करण्यात आली असून 362 स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. आजअखेर 27 जणांना जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेली होती. यापैकी 26 जण कोरानामुक्त झाले असून एकाचा मृत्यू झालेला आहे. आत्तापर्यंत 1437 व्यक्तींचा १४ दिवसाचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला असून सद्यस्थितीत २९६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी दिली.
वाराणशीहून आलेल्या 33 प्रवाशांमधील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर सांगली मिरज कुपवाह शहर महानगरपालिका क्षेत्रातील ३५ स्वॅबची तपासणी करण्यात आली असून यातील २३ निगेटीव्ह आले आहेत तर १२ स्वॅबचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. मरकस संबंधित ३६ सॅम्पल्स पैकी ३५ निगेटीव्ह (दुसरी तपासणी) आल्या आहेत तर एकाचा अहवाल अप्राप्त आहे.
इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये 189 व्यक्तीपैकी 116 जणाना सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत 73 व्यक्ती इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये (मिरज येथे ४१, इस्लामपूर येथे शासकीय तंत्रनिकेतन ३१) आहेत.
0000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा