रविवार, १९ एप्रिल, २०२०

सांगली जिल्ह्यातील उद्योग घटक सुरू करताना आवश्यक खबरदारी घ्या - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 19, (जि. मा. का.) :  कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये काही क्षेत्रात विशेष खबरदारी घेऊन यामध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. या अनुषंगाने महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रातील एमआयडीसी सहकारी औद्योगिक वसाहती मधील उद्योग घटकांना सूचित करण्यात येते की, जे उद्योग घटक आपल्या आस्थापनेवरील कामगारांची रहाण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणीच करू शकतील, अशा आस्थापनांनी आपले उद्योग सुरू करण्याबाबत http://permission.midcindia.org या वेबसाईटवर अर्ज करावेत. सदर आस्थापनांच्या कामगारांना  कोणत्याही प्रकारे वाहतुकीची परवानगी देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
तसेच ग्रामीण भागातील उद्योग घटकांनी त्यांच्या कामगारांची ने-आण करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून समर्पित वाहन व्यवस्थेची सुविधा पुरविण्याची खबरदारी घ्यावी. किंवा त्याच आस्थापना आवारात रहाण्याची व्यवस्था करावी. अशा आस्थापनांनीही आपले उद्योग सुरू करण्याबाबत http://permission.midcindia.org या वेबसाईटवर अर्ज करावेत.
सर्व उद्योग घटकांनी महाराष्ट्र शासनाचे आदेश क्र. DMU/2020/CR.92/DisM-1 दि. 17 एप्रिल 2020 मधील परिशिस्ट II मध्ये नमूद केलेल्या कामाच्या ठिकाणी पाळावयाच्या सोशल डिस्टन्सिंग एसओपी (Standard Operating Procedure) चे पालन करणे अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा