मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश जारी


सांगली, दि. 14, (जि. मा. का.) :   कोरोना विषाणूचा संसर्ग प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने  जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात दिनांक 15 एप्रिल 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 30 एप्रिल 2020 रोजीचे रात्री 24.00 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे बंदी लागू केली आहे. या आदेशानुसार सर्व खाजगी, कॉर्पोरेट, व्यापारी, करमणूक आस्थापना संपूर्णत: बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.
मात्र सदर आदेशानुसार पुढील जीवनावश्यक सेवा वस्तू पुरविणाऱ्या आस्थापना त्यामधून वगळण्यात आल्या आहेत. अन्न धान्य, भाजीपाला, फळे, मांस विक्री केंद्रे, किराणा, दुध इत्यादी जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या आस्थापना, औषध दुकाने, रूग्णालये, आरोग्य विषयक सेवा पुरविणारी केंद्रे, जीवनावश्यक वस्तू उदा. अन्नधान्य, शेती मशागती विषयक, औषध विषयक, कीड नियंत्रण विषयक, वैद्यकीय उपकरणे इत्यादी उत्पादन, वाहतूक पुरवठा करणारी साखळी यंत्रणा या विषयाचा ई-व्यापार आणि जीवनावश्यक अन्नधान्य, किराणा, फळे, मांस केंद्रे इत्यादी साठवणूक करून ठेवलेली वेअर हाऊसेसे, पिण्याचे पाणी पुरवठा, सार्वजनिक कचरा व्यवस्थापन स्वच्छता पुरविणाऱ्या सेवा, बँकिंग आणि आरबीआय मार्फत नियंत्रित होणाऱ्या इतर सेवा विमा कंपन्या, दूरध्वनी इंटरनेट सेवा, प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे (मिडिया), विजपुरवठा, इंधन (डीझेल-पेट्रोल), गॅस, उर्जा पुरवठा.

खाद्यगृहे, खानावळ, रेस्टोरंट
खाद्यगृहे, खानावळ, रेस्टोरंट हॉटेल्स यामध्ये हॉटेलमध्ये ग्राहकांना बसवून सेवा देणे यावर बंदी लागू केली आहे. तथापि घरपोच सेवा, पार्सल कौंटर सर्व्हिस यांना बंदी आदेश लागू राहणार नाही.

 आठवडीबाजार
जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजारांना बंदी आदेश लागू राहतील.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परिवहन बसेस मार्फत होणाऱ्या वाहतूक व्यवस्थेस बंदी करण्यात आली आहे. मात्र महामंडळामार्फतच्या अत्यावश्यक सेवा वस्तू पुरविणाऱ्या वाहतूक व्यवस्थेस बंदी आदेश लागू राहणार नाही.
रिक्षा, टॅक्सी (वडाप), खाजगी बसेस, मिनी बसेस इतर कोणत्याही वाहनाद्वारे होणारी व्यवसायिक प्रवासी वाहतुकीस बंदी आदेश लागू राहतील.

जनावरांचे आठवडे बाजार
       एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील जनावरांचे आठवडा बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे.
शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस, प्रशिक्षण केंद्रे
       एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यातील (शहरी ग्रामीण) सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक खाजगी क्लासेस, आयुक्त, व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनावरील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पानपट्टी, मावा विक्री, तंबाखुजन्य पदार्थ विक्री केंद्रे
तंबाखुजन्य पदार्थाच्या माध्यमातून थुंकीमधून प्रसार होऊ नये याकरीता पानपट्टी, मावा विक्री, प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ विक्री केंद्र बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पेट्रोल डिझेल विक्री
सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीतील सर्व पेट्रोल पंप धारकांना पेट्रोल डिझेल विक्री करण्यास बंदी लागू केली आहे. मात्र सदरचा आदेश पुढील बाबतीत लागू राहणार नाही - जीवनावश्यक वस्तु (उदा. अन्न धान्य, भाजीपाला, फळे, मांस विक्री केंद्रे, किराणा, दुध, पाणी पुरवठा, गॅस इत्यादी) पुरवठा करणारी वाहने, अत्यावश्यक सेवा (उदा. औषध, रूग्णालये, आरोग्य, विजपुरवठा, उर्जा पुरवठा, कीड नियंत्रण विषयक सुविधा, वस्तू कृषी उत्पादरावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनी / कारखाने/ उद्योग/व्यवसाय इत्यादी) यांचा पुरवठा करणारी वाहने, शेती मशागतीच्या कामासाठी, सर्व वैद्यकीय सेवा पुरविणारे खाजगी/शासकीय डॉक्टर्स, कर्मचारी, कायदेशीर कर्तव्य बजावीत असणारी अधिकारी कर्मचारी यांचे वाहन, कोरोना नियंत्रण निर्मुलनासाठी कार्य करणारी शासकीय/खासगी वाहने, सर्व शासकीय वाहने, वैद्यकीय उपाचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती, बँकिंग आणि आरबीआय मार्फत नियंत्रित होणाऱ्या इतर सेवा विमा कंपन्या यांचे कर्मचारी, दूरध्वनी इंटरनेट सेवा पुरविणारे कर्मचारी, प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे (मिडिया) इत्यादी.

सांगली जिल्हा स्थलसीमा हद्द वाहतुकीसाठी बंद
          कर्नाटक राज्याला लागून असणाऱ्या सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दी राज्यातील इतर जिल्ह्याला लागून असणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या स्थलसीमा हद्दी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. (अत्यावश्यक सेवा जीनावश्यक वस्तु उदा. अन्न धान्य, भाजीपाला, फळे, मांस, किराणा, दुध, पिण्योच पाणी, औषधे वगळून).

धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी मनाई
संपूर्ण सांगली जिल्ह्यातील ग्रामीण शहरी भागातील खाजगी सार्वजनिक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सामान्य नागरिकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी मनाई केली आहे. मात्र धार्मिक स्थळांच्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या पूजाअर्चा नित्यनियमांच्या विधीना प्रतिबंध असणार नाही.
खाजगी सार्वजनिक, प्रवासी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी
सांगली जिल्ह्यात सर्व प्रकारच्या खाजगी सार्वजनिक, प्रवासी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी लागू केली आहे. मात्र अत्यावश्यक वस्तू उदा. अन्न धान्य, फळे, किराणा, दुध, मांस, औषधे, कीड नियंत्रण विषयक प्रशासकीय, वैद्यकीय सेवा तसेच इतर अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसाठी निकडीच्या प्रसंगासाठीच्या (emergency) वापरण्यात येणाऱ्या खाजगी सार्वजनिक वाहनांना सदरचा बंदी आदेश लागू राहणार नाही.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा