मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

कोरोना : जीवनावश्यक वस्तुंच्या 5 हजार किटच्या माध्यमातून 20 हजार गरजवंताना प्रशासन करणार मदत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

आजअखेर 1 हजार 775 किटचे वितरण

सांगली (जि.मा.का) 7 : कोवीड-19 मुळे संकटात सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील रोजंदारीवरील मजूर, निराधार, ऊसतोड मजूर, भटके, परराज्यातील मजूर, ज्यांच्याकडे रेशनकार्ड उपलब्ध नाही असे, यांना मदतीसाठी जिल्ह्यात ü जीवनावश्यक वस्तुंच्या 5 हजार किटच्या वितरणाव्दारे 20 हजार गरजवंताना जिल्हा प्रशासनामार्फत स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून मदतीचे नियोजन करण्यात आले आहे. आजअखेर 1 हजार 775 किटचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
मदत संकलनाचे वितरणाचे नियोजन अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपजिल्हाधिकारी विजय देशमुख, तहसिलदार (पुरवठा) शिल्पा ओसवाल यांची टीम करत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱ्या लोकांची जेवणाची सोय व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. अशा लोकांना मदत करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, व्यापारी संस्था आदिंना मदतीसाठी आवाहन करण्यात आले असून जिल्हास्तरावर मदत स्वीकृती केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सकल जैन समाज सांगली, राधेकृष्ण एक्सस्टेशन प्रा. लि., इंडियन रेडक्रॉस सोसायटी, हेमंत महाबळ, मनोहर हनुमानबगस सारडा यांनी जीवनावश्यक वस्तुंचे किट प्रशासनाला दिले आहेत. प्रत्येक किटमध्ये 4 व्यक्तींच्या कुटुंबाला 10 दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे. यामध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, चहा पावडर, तिखट, मिठ, तेल, डाळी, साबण यासह सुमारे 11 जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे. सुमारे 750 रूपये किंमतीच्या या किटची पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सोमवार पासून  वितरणाची सुरूवात झालीे असून 5 हजार किटच्या माध्यमातून 20 हजार गरजू व्यक्तींपर्यंत मदत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरावरही तहसिलदार यांनी नियोजन करून अद्यापर्यंत सुमारे 2 हजार जीवनावश्यक वस्तु किटचे वितरण केले आहे.
गरजवंताना मदत करण्यासाठी ज्या दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, व्यापारी, व्यापारी संस्था, अशासकीय संस्था, सहकारी संस्था इतर व्यक्ती यांची इच्छा आहे त्यांनी जिल्हास्तरीय मदत स्वीकृती केंद्र जिल्हा नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांनी देऊ केलेली मदत गरजू व्यक्तीपर्यंत देण्याची दक्षता जिल्हा प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे.
जिल्हास्तरीय मदत स्विकृती केंद्र जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 0233-2600500, मोबाईल क्रमांक 8208689681, टोल फ्री क्रमांक 1077, तालुका नियंत्रण कक्ष मिरज 0233-2222682, शिराळा  02345-272137, 9922447812, 9359807492, वाळवा 02342-222250, 9423335135, 7350202617, पलूस  02346-226888, 9403683444, 7387654331, कडेगाव 02347-243122, 8275917674, 7972947452, तासगाव 02346-250630, 8482876900, कवठेमहांकाळ 02341-222039, 9823541428, 9834618823, खानापूर 02347-272626, आटपाडी 02343-221624, 7387437462, जत 02344-246234, 9763287777.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा