मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

रेशीम दिन कार्यक्रम जालना येथे 1 सप्टेंबरला स्टॉल नोंदणीचा अंतिम दिनांक 26 ऑगस्ट


सांगली (जि. मा. का.) दि. 20 :  रेशीम संचालनालय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत रेशीम दिन 2019 कार्यक्रम दिनांक 1 सप्टेंबर 2019 रोजी जालना येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या स्थळी रेशीम संचालनालयातर्फे दिनांक 30 ऑगस्ट ते 01 सप्टेंबर रोजी रेशीम कृषि प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. रेशीम साहित्य निर्मिती करणारे, कृषि कंपन्या, विमा कंपन्या, खाद्य पदार्थ विक्री करणारे, रेशीम व कृषिसाठी उपयुक्त साहित्य निर्मिती करणारे उत्पादक व विविध बचत गट इत्यादिंनी प्रदर्शनी स्थळी स्टॉल लावावेत. स्टॉल नोंदणीचा अंतिम दिनांक 26 ऑगस्ट आहे. अशी माहिती रेशीम विकास अधिकारी सांगली यांनी दिली.
रेशीम कृषि प्रदर्शनी भव्य स्वरूपाची असून स्टॉलचे आरक्षण प्रथम आगमन - प्रथम प्राधान्य स्तरावर करण्यात येणार आहे. स्टॉल नोंदणी तसेच अधिक माहिती व संपर्कासाठी रेशीम संचालनालय, नागपूर फोन क्रमांक 0712-2569924 /  2569926, ई-मेल - dos.maha@gmail.com. सहायक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय, औरंगाबाद फोन नं. 0240-2475747, मो.क्र. 9420191067, ई-मेल - adsilkaurangabad@gmail.com. रेशीम विकास अधिकारी, जालना फोन नं. 02482-229047, मो.क्र. 9850447096, ई-मेल - reshimjalna@gmail.com. येथे संपर्क साधावा.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा