शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

मृत 13 हजार 627 जनावरांचा पंचनामा 80 लाख 72 हजार 200 रूपये अनुदान वितरीत

सांगली, दि. 23 (जि.मा.का) : जिल्ह्यात महापूरामुळे बाधित कुटुंबातील 23 हजार 844 जनावरे मयत असून त्यापैकी 13 हजार 627 जनावरांचा पंचनामा झाला आहे. पंचनामा झालेल्या जनावरांच्या नुकसानीसाठी 80 लाख 72 हजार 200 रूपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
मयत जनावरांपैकी दुधाळ जनावरांमध्ये गाय, म्हैस, उंट या संवर्गातील 210 जनावरे मृत असून 63 लाख रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तर मेंढी, बकरी, डुक्कर या वर्गातील 41 जनावरे मृत असून 1 लाख 23 हजार रूपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. ओढकाम करणाऱ्या जनावरांमध्ये उंट, घोडा, बैल यामधील 5 जनावरे मृत असून 1 लाख 25 हजार रूपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. वासरू, गाढव, शेंगरू, खेचर यामधील 90 जनावरे मृत असून 14 लाख 24 हजार रूपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. 13 हजार 281 कोंबड्या मृत असून यासाठी 1 लाख रूपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. असे एकूण 13 हजार 627 पंचनामा झालेल्या जनावरांच्या नुकसानीसाठी 80 लाख 72 हजार 200 रूपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. पंचनामे गतीने करण्याचे निर्देश देण्यात आले असून पंचनाम्यानंतर अनुदान त्वरीत वितरीत करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा