शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

विविध विस्तार योजना वितरकामार्फत अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे


सांगली, दि. 23 (जि.मा.का.) : महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत सन 2019-20 मध्ये विविध विस्तार योजनेंतर्गत सांगली जिल्ह्याकरीता वितरकामार्फत अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणाचे लक्षांक प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांनी नजिकच्या महाबीज वितरकामार्फत अनुदान वजा जाता शेतकरी हिस्सा आदा करून बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे यांनी केले आहे.
श्री. साबळे म्हणाले, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा या पिकाचे जिल्ह्यात 10 वर्षाच्या वरील प्रमाणित बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 2500 रूपये प्रति क्विंटल या प्रमाणे अनुक्रमे 278 क्विंटल वाटपाचे तसेच 10 वर्षाच्या आतील बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 5 हजार रूपये प्रति क्विंटल या प्रमाणे 561 क्विंटल लक्षांक आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामात ज्वारी या पिकाचे संकरीत वाणाचे 10 वर्षाच्या आतील प्रमाणित बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 10 हजार रूपये प्रति क्विंटल या प्रमाणे अनुक्रमे 65 क्विंटल लक्षांक आहे. तसेच सुधारीत वाणाचे ज्वारी या पिकाचे 10 वर्षाच्या आतील प्रमाणित बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 3 हजार रूपये प्रति क्विंटल या प्रमाणे अनुक्रमे 329 क्विंटल लक्षांक आहे. तसेच सुधारीत वाणाचे ज्वारी या पिकाचे 10 वर्षाच्या वरील प्रमाणित बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 1500 रूपये प्रति क्विंटल याप्रमाणे 415 क्विंटल लक्षांक आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा