मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

शेळी, मेंढी, मांसल कुक्कुट पक्षी योजनेसाठी गुरूवारी उपस्थित रहाण्याचे आवाहन

          सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : सन 2019-20 मध्ये सांगली जिल्ह्यात राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना म्हणून अंशत: ठाणबंध पध्दतीने 10 + 1 शेळी किंवा मेंढी गट वाटप योजना व 1000 मांसल कुक्कुट पक्षी वाटप करणे या दोन योजना राबविण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. ज्या लाभार्थींनी या दोन्ही योजनेसाठी अर्ज केले आहेत त्यांनी दिनांक 29 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मिरज डॉ. संजय धकाते यांनी केले आहे.
            डॉ. संजय धकाते म्हणाले, शासनाने जिल्हास्तरीय लाभार्थी समिती गठित केलेली असून त्या समितीचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत. लाभार्थींची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11.30 वाजता सभेची वेळ दिलेली आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा