गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९

डी.एल.एड. शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी मुदतवाढ

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश सन 2019-20 शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्याबाबतची कार्यवाही 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2019 या कालावधीत पूर्ण केलेली आहे. तथापि राज्यातील नैसर्गिक आपत्ती विचारात घेता या प्रक्रियेस दिनांक 14 ते 20 ऑगस्ट 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था सांगलीचे प्राचार्य यांनी दिली.
प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याची मुदत 14 ते 20 ऑगस्ट 2019 आहे. पडताळणी केंद्रावर जाऊन मूळ प्रमाणपत्रे पडताळणी करून घेणे व ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करण्याची मुदत दिनांक 14 ते 21 ऑगस्ट 2019 आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा