शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

नुकसानग्रस्त 63.62 टक्के पीक क्षेत्राचा पंचनामा उर्वरित पंचनामेही गतीने सुरू

सांगली, दि. 24 (जि.मा.का.) :  पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 42055.15 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. ही टक्केवारी 63.62 टक्के असून उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
पुरामुळे बाधित पीक क्षेत्राच्या गावांची संख्या 249 असून यातील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित आहे. यापैकी 84 हजार 737 शेतकऱ्यांच्या 42055.15 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे.
 यामध्ये मिरज तालुक्यातील 27 गावातील 29 हजार 242 बाधित शेतकऱ्यांचे 14 हजार 838 हेक्टर क्षेत्र बाधित असून 15 हजार 948 शेतकऱ्यांच्या 11543.42 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे. वाळवा तालुक्यातील 44 गावातील 33 हजार 290 बाधित शेतकऱ्यांचे 16 हजार 190 हेक्टर क्षेत्र बाधित असून 25 हजार 839 शेतकऱ्यांच्या 11931.09 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे. शिराळा तालुक्यातील 95 गावातील 36 हजार 250 बाधित शेतकऱ्यांचे 19 हजार 636 हेक्टर क्षेत्र बाधित असून 24 हजार 257 शेतकऱ्यांच्या 8143.69 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे. पूलस तालुक्यातील 31 गावातील 19 हजार 240 बाधित शेतकऱ्यांचे 14 हजार 680 हेक्टर क्षेत्र बाधित असून 16 हजार 29 शेतकऱ्यांच्या 9383.23 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे. तासगाव तालुक्यातील 4 गावातील 994 बाधित शेतकऱ्यांचे 483 हेक्टर क्षेत्र बाधित असून 656 शेतकऱ्यांच्या 439.32 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला असून कडेगाव तालुक्यातील 2 हजार 8 शेतकऱ्यांच्या 614.40 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाला आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा