गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९

स्वयंरोजगार करणाऱ्या पूरबाधितांना संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून जवळपास 472 लाभार्थींना कर्ज दिलेली आहेत. कृष्णा नदीला आलेल्या पुराने बरेच स्वयंरोजगार करणाऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. पलूस, शिराळा, मिरज व वाळवा तालुक्यात सर्वात जास्त पूराचा फटका बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने पोल्ट्री, शेळीपालन, पशुपालन, व्यावसायिक दुकाने, वाहने असे विविध उद्योग करणाऱ्यांचा समावेश आहे. तरी नुकसान झालेल्या जागेचे फोटो, सद्यपरिस्थती, तलाठी पंचनामा रिपोर्टसह जिल्हा कौशल्य व रोजगार उद्योजकता विकास केंद्र, सांगली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक सर्जेराव पाटील व किशोर साळुंखे यांनी केले आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा