शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

पुराच्या पाण्यामुळे घरे पडलेल्या बांधकाम कामगारांनी अर्ज करावेत - सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : बांधकाम कामगारांची नोंदणी दिनांक 31 मे 2019 पूर्वी झालेली आहे. ज्या बांधकाम कामगारांचे स्वत:च्या अथवा पत्नीच्या मालकीचे कच्चे घर यावर्षी झालेल्या पुराच्या पाण्यामुळे पडले आहे. अशा व इतर सर्व पात्रताधारक बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत (ग्रामीण)  विहीत नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांनी संबंधित कागदपत्रासह सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा