शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

अन्न व औषध प्रशासनातर्फे 30 आस्थापनांची तपासणी पूरग्रस्तांना रास्त दराने जीवनावश्यक वस्तु पुरवठा करण्याचे आवाहन

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दिनांक 14 ऑगस्ट रोजी विविध ठिकाणच्या 30 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या आस्थानांना पूरग्रस्त जनतेला माफक दरात दुधाची विक्री करण्याबाबत व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू, दूध व पाण्याचा पुरवठा हा रास्त व किफायतशीर किंमतीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. योग्य दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू पाणी व दूध योग्य त्या किंमतीने न विकल्यास आस्थापना सील केल्या जातील, असा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सु. आ. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली  द. ह. कोळी, सु. मा. दांगट, र. ल. महाजन, अ. भु. कोळी, श्रीमती मे. स. पवार, सु. स. हाके, यांनी केली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा