रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी पशुखाद्य व चारा वितरीत

सांगली, दि. 18 (जि.मा.का) : जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होणारे पशुखाद्य व चारा पूरबाधित तालुक्यातील पशुपालकांना वितरीत करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
वारणा सहकारी दूध उत्पादक संघाकडून हायग्रेन प्यालेट ५० नग, महाड मॅन्यूफॅक्चर असोसीएशनकडून ५० किलोच्या २०० पशुखाद्य पिशव्या, सुमित ट्रेडर्स मुंबई जनरल मॅनेजर, देवनार गोवंडी यांच्याकडून 360 ब्लिचिंग पावडर पिशव्या, उत्तम कोळेकर भिवंडी मंबई यांच्याकडून ६० ब्लिचिंग पावडर पिशव्या, पशुधन विकास विभाग रत्नागिरी विभाग रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त पशुखाद्य, बारामती ॲग्रो लिमिटेड यांच्याकडून १० टन पशुखाद्य, पालघर एमएमए संस्था महाड यांच्याकडून ६१० पोती मीठ, व्यवस्थापक आयआरबी रायगड यांच्याकडून ५ टन हिरवा चारा, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाकडून २५० पिशव्या पशुखाद्य, जिल्हा प्रशासन रायगड व पशुधन विकास अधिकारी माणगाव कर्मचारी संघटना यांच्याकडून ३ टन ओला चारा, ७ टन सुखा चारा, कडबा कुट्टी २५ किलो, भाताचा कोंडा २५ किलो आणि नेचर डेअरी कळस इंदापूर यांच्याकडून ८ हजार ३७० किलो ऊस व जयहिंद गोळी पेंड १०० पिशव्या, रायगड जिल्ह्यातून ६ टन चारा प्राप्त झाला आहे. पशुधनासाठी प्राप्त चारा व खाद्य पूरग्रस्त भागात वितरीत करण्यात आले आहे.
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा