गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९

पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने सांगलीतील पूरगस्तांना मदत

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : महापूराने वेढलेल्या सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दोन ट्रक धान्य जमा केले आहे. यामध्ये प्रत्येक किटमध्ये 15 किलो धान्य गहू, तांदूळ व डाळ असे 800 किट देण्यात आले आहेत. शिवाय 17 टन गव्हाचे पीठ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मदत स्वीकृती व वितरण केंद्राकडे जमा केले. सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने दै. सकाळ चे सांगली आवृत्तीचे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी हे साहित्य  विशेष कार्य अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी अण्णासाहेब चव्हाण यांनी प्रशासनाच्या वतीने या मदतीबद्दल आभार मानले.
     मदत स्वीकृती केंद्राकडे दिनांक 14 ऑगस्ट अखेर 2402 बिस्कीटाचे बॉक्स, 6200 पाणी बॉटल्स, 5 हजार 123 किलो तांदूळ, 2 हजार 20 किलो गहू, राजगीरा, फरसाणा, कुरकुरे आदिंचे  406 बॉक्स, 560 किलो तेल, 52 किलो मसाला, 542 किलो तूरडाळ, 1 हजार 37 किलो आटा, जवळपास 3 हजार 928 साड्या, 1 हजार 414 ब्लँकेट, 28 किलो चहापूड, 489 कॅरेट लाडू, 2 हजार 165 मेणबत्ती बॉक्स, 384 किलो दूध पावडर, 2 हजार नग मच्छर कॉईल, 150 किलो भरडा, 100 नग विद्यार्थ्यांची दफ्तरे, 500 बकेट, 360 बॅग ब्लिचिंग पावडर यांच्यासह अन्य जीवनावश्यक वस्तू संकलित झाल्या आहेत.
     ज्या संस्था, व्यक्तिंना मदत द्यावयाची आहे, त्यांनी सदरची मदत एका कुटुंबाला एक संसारोपयोगी साहित्याचे किट याप्रमाणे बनवून द्यावी. यामध्ये भांडी, काही धान्य, स्वच्छतेचे साहित्य, शैक्षणिक गरजेच्या वस्तू अशा प्रकारांच्या समावेश असावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा