शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

बुधगाव येथील शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत


सांगली, दि. 23 (जि.मा.का.) : शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृह, बुधगाव या वसतिगृहात माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि वरीष्ठ महाविद्यालयातील तसेच आयटीआय प्रवेशित प्रत्येकी 10 आर्थिकदृष्या मागासवर्गीय असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचे आहेत.    यासाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दिनांक 31 ऑगस्ट 2019 आहे. अशी माहिती वसतीगृह प्रमुख यांनी दिली.
            वसतिगृहामध्ये राहण्याची व जेवणाची सुविधा मोफत पुरविली जाते. वसतिगृहामध्ये अर्ज मोफत देण्यात येत असून आवश्यक कागदपत्रासह विहीत मुदतीत सादर करावा, असे आवाहन वसतीगृह प्रमुख यांनी केले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा