मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

पूरग्रस्त बाधित कुटुंबांना 21 कोटी 82 लाख 30 हजाराचे सानुग्रह वाटप - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 20 (जि.मा.का) : सांगली जिल्ह्यात महापुराच्या पार्श्वभूमीवर 104 गावे पुरामूळे बाधित झाली आहेत. बाधित पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात 10 हजार आणि शहरी भागात 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. त्यापैकी 5 हजार रुपयांचे रोख वाटप करण्यात येत आहे. दिनांक 19 ऑगस्ट अखेर ग्रामीण भागातील 31 हजार 140 आणि शहरी भागातील 12 हजार 506 कुटूंबांना रोखीने एकूण 21 कोटी 82 लाख 30 हजाराचे सानुग्रह अनुदान पूरग्रस्त कुटूंबांना वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित कुटुंबांनाही अनुदान वाटप सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
            यामध्ये मिरज तालुक्यातील 20 गावे बाधित असून यातील ग्रामीण भागातील 9 हजार 229 तर शहरी भागातील 12 हजार 491 कुटूंबांना, वाळवा-इस्लामपूर तालुक्यातील 38 गावे बाधित असून यातील 9 हजार 826 कुटूंबांना, शिराळा तालुक्यातील 21 गावे बाधित असून यातील 590 कुटूंबांना आणि पलूस तालुक्यातील 25 गावे बाधित असून यातील 11 हजार 495 ग्रामीण तर 15 शहरी कुटूंबांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे.        .
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा