मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

पूरग्रस्त भागात 10 हजार 70 घरांचे नुकसान पंचनामे गतीने सुरू - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 20 (जि.मा.का) : महापुरामुळे जिल्ह्यातील 2 हजार 831 घरे पूर्णत: तर 7 हजार 239 घरे अंशत: पडली आहेत. पडझड व नष्ट झालेल्या 146 झोपड्या असून 101 गोठ्यांचे नुकसान झाले आहे.  घरांचे पंचनामे गतीने सुरू असून 19 ऑगस्ट अखेर पूर्णत: पडझड झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांची संख्या 2 हजार 831 इतकी आहे. अंशत: पडझड झालेली घरे 7 हजार 239 आहेत. तर 146 झोपड्या पडझड व नष्ट झाल्या आहेत. बाधित गोठे 101 आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
            यामध्ये मिरज तालुक्यात पूर्णत: पडझड झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांची संख्या 622 असून अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या 916 आहे. बाधित गोठ्यांची संख्या 90 आहे. महानगरपालिका क्षेत्रात पूर्णत: पडझड झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांची संख्या 114 असून अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या 304 आहे. वाळवा तालुक्यात पूर्णत: पडझड झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांची संख्या 637 असून अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या 2560 आहे. शिराळा तालुक्यात पूर्णत: पडझड झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांची संख्या 27 असून अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या 982 आहे. बाधित गोठ्यांची संख्या 7 आहे. पलूस तालुक्यात पूर्णत: पडझड झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांची संख्या 1431 असून अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या 1514 आहे. पडझड व नष्ट झालेल्या झोपड्यांची संख्या 146 आहे. खानापूर-विटा तालुक्यात अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या 131 आहे तर बाधित गोठ्यांची संख्या 2 आहे. तासगाव तालुक्यात अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या 283 आहे तर बाधित गोठ्यांची संख्या 2 आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा