मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट


सांगली (जि. मा. का.) दि. 20 : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. सन 2019 च्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले असून अर्ज www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. या पुरस्कारांची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2019 आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी दिली.
बाल शक्ती पुरस्कार ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंत) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो.
बाल कल्याण पुरस्काराअंतर्गत मुलांचा विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस वैयक्तिक पुरस्कार दिला जातो. तसेच संस्था स्तरावर बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा